मराठा राजकीय सत्ताचा उदय आणि पाया
प्रश्न.1. मराठी सत्तेच्या उदयाची कारणे?
सतराव्या शतकात मराठा सत्तेचा उद्यास मोठ्या प्रमाणावर पोषक परिस्थितीची निर्मिती झाली होती. एकदम न होता त्यास अनेक वर्षे लागली होती. इस्लामी सत्तेने जो अन्याय, अत्याचार व जुलूम केला होता. तो नष्ट करण्यासाठी मराठ्यांनी आपले राज्य स्थापन केले. मराठा राज्य उदयास जी अनेक कारणे आहेत ते पुढील प्रमाणे आहेत:
मराठा सत्तेच्या उदयाची कारणे:
1.मराठ्यांचा डोंगराळ प्रदेश:
मुस्लिम युद्धशास्त्र व तंत्र यांमध्ये हिंदूंपेक्षा प्रगत होते. तरी पण मराठ्यांनी डोंगराळ प्रदेशाच्या मदतीने त्यांना नामोहरम केले. या दुर्गम प्रदेशात अवघड किल्ले, प्रचंड पाऊस व हिंस्र पशू की मोठ्या प्रमाणात होते. त्यामुळे मोगल सरदारांना मराठ्यांना जिंकणे अशक्य झाले. डोंगराळ प्रदेशामुळे व त्यांचे राज्य टिकून राहिले.
मराठ्यांमध्ये साहस,शौर्य,काटकपणा,चिकाटी,स्वाभिमान,स्वावलंबन,कष्टाळू वृत्ती,दृढनिश्चय वृत्ती इत्यादी गुण होते आणि ते शिवाजी राजांना हिंदवी स्वराज्य स्थापन करताना उपयोगी पडले. "मराठी स्वाभिमानी व शूर होते. शत्रूला आधी कल्पना देऊन सावध करत व मग सूड उगवत. आपल्याला दुखविणारे,अपमान करणाऱ्याचा बदला घेण्यासाठी स्वता:चा जीवसुद्धा धोक्यात घालत. शरणागताला प्राणपणाने सहाय्य करत."
3. मराठ्यांचे तीर्थक्षेत्र:
मराठा सत्तेचा उदयामध्ये तीर्थक्षेत्र आणि मोठे कार्य केले आहे. पंढरपूर,आळंदी,देहू,पैठण,नासिक,नेवासा इत्यादी तीर्थक्षेत्रांनी मराठी माणसांना धर्म भावाने एकत्र आणणारी शक्तीस्थाने ठरली. त्यामुळे माणसा-माणसातील मतभेद कमी होऊन भक्ती हाच भाव निर्माण झाला.त्यामध्ये हिंदू-मुस्लीम भेद मराठ्यांनी केला नाही.म्हणून शिवाजीराजांच्या काळात सर्व धर्म गुण्यागोविंदाने नांदत होते.
4. मराठ्यांची गनिमी काव्याची परंपरा:
मराठी गनिमी काव्याने लढण्यासाठी प्रसिद्ध होते. निजामशाहीचा वजीर मलिक अंबर येणे गनिमी काव्याने मुघल- आदिलशाही यांच्याशी लढून संरक्षण निर्माण केले. शहाजीराजांनी तोच वारसा पुढे चालू ठेवला. शिवाजी महाराजांनी त्यात विकास केला. संभाजी राजे, संताजी व धनाजी यांनी परंपरा पुढे चालू ठेवून मोगलांशी सदैव संघर्ष करून विजय मिळवण्याचा प्रयत्न केला.
5. मुसलमानांच्या धार्मिक अत्याचाराविरुद्ध मराठ्यांची प्रतिक्रिया:
बहामनी सुलताना पासून ते औरंगजेब पर्यंत काही अपवाद वगळता सर्व मुस्लिम राज्यकर्त्यांनी दक्षिणेतील हिंदू प्रजेवर अत्याचार व जुलूम केले होते. त्याच्याविरुद्ध मराठ्यांनी उठाव केले म्हणजे ती एक धार्मिक प्रतिक्रिया होती.
6. मराठा धर्माच्या कल्पनेचा प्रभाव:
सतराव्या शतकातील विचारी पुरुषांची मने महाराष्ट्र धर्माच्या कल्पनेने भारावून गेले होते. महाराष्ट्रधर्माची उकल= हिंदू धर्म+ धर्मस्थापना+ गोब्राह्मणप्रतिपालक+ स्वराज्य स्थापना+ एकीकरण+ धुरीकरण अथवा धुरीणता अशी होती.
7. शहाजीराजांचा वारसा:
शहाजीराजांकडून शिवाजीराजांना कोणता वारसा मिळाला. याबाबत इतिहासकारांच्या मनांमध्ये मतभेद आहेत. त्यांनी निजामशाहीच्या रूपाने स्वतंत्र राज्य निर्माण करण्याचा प्रयत्न केला. कर्नाटक मध्ये राहून हिंदू नायक एकत्र करून हिंदू धर्म निर्माण करण्याचा प्रयत्न केला. शिवाजी राजांना अप्रत्यक्षपणे अनेक वेळा मदत केली. गो.स.सरदेसाई म्हणतात, "शिवाजीला जर राज्य संस्थापक म्हणावयाचे असेल तर शहाजीराजांना राज्य संकल्पक असे पद देण्यास हरकत नाही."
![]() |
लेबल: badsha, gad, historical place, history, indian, indian fort, indian history, king, maharashtra, maharashtra history, maratha history, mpsc, place, purandar, sambhaji maharaj, shivaji maharaj, stude, upsc
5 टिप्पणियाँ:
Dipak bagujar
Santosh thosar
भेन्चोद
खुप महत्वाचे उत्तर दिले आहे धन्यवाद.🙏🙏
खुप महत्वाचे उत्तर दिले आहे धन्यवाद 🙏🙏
एक टिप्पणी भेजें
सदस्यता लें टिप्पणियाँ भेजें [Atom]
<< मुख्यपृष्ठ